प्रेम संबंधातील त्रासाला कंटाळूनअकलूज येथील मुलीची नीरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या
अकलूज (प्रतिनिधी )प्रेम संबंधातील त्रासाला कंटाळून अकलूज येथील 19वर्षीय वर्षीय मुलीने निरा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची पटना रविवारी 8जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मुलीचा आत्ते भाऊ याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसांनी हर्षद अप्पा घोंगडे (वय ३० वर्षे रा. आझाद चौक अकलूज) या शिक्षकाला अटक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश माळशिरसच्या न्यायालयाने सोमवारी दिला. याबाबत अकलूज पोलिसाकडून मिळालेल्या माहिती नुसार हर्षद घोंगडे याचे त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका मुली बरोबर प्रेम संबंध होते. गेल्या ४ महिन्यापूर्वी त्यांचे प्रेम प्रकरण युवतीच्या घरच्यांना कळाल्यावर मुलीच्वा घरच्यांनी मुलाला मुलीशी प्रेमसंबंध ठेवू नको असे सांगितले होते. त्यावेळी हर्षद घोंगडे याने प्रेमसंबंध ठेवणार नाही असे सांगितले. होते. परंतु प्रेमसंबंध पुढे चालू राहिले. रविवारी पहाटे 3 च्या सुमारास मुलगी आणि हर्षद या दोघांमध्ये भांडणाचा आवाज ऐकू आल्याने मुलीचे भाऊ घटनास्थळी आले होते. त्यावेळी हर्षद हा पळून गेला. त्यानंतर भावाने मुलीला घरी आणून सोडले होते. सकाळी ही घरातून गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सकाळी 20:30 च्या सुमारास निरा नदीच्या शनी घाटाजवळ मुलीचा मृतदेह पाण्यात आढळून आला. मुलीने नदीत उडी पेऊन आत्महत्या केल्याचे कळाल्यावर मुलीचा आत्ते भाऊ मनोज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसांनी हर्षद घोंगडे याच्यावर भादवि कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी हर्षद घोंगडे हा टेंभुर्णी येथे शिक्षक असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. पुढील तपास अकलूज पोलीस ठाणे चे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक निरीक्षक सुनील जाधव हे करीत आहेत.






