शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ अशोक नायकोडे सर….!!!लहान पणापासूनच संघर्षाची झुंज देत, जिद्द ,कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास या गुणवैशिष्ट्यामुळे आपल्या जीवनाला आकार देणारे अशोक अर्जुन नायकोडे सर यांचा हसरा चेहरा समोर येतो. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून येणाऱ्या संकटाचा सामना करीत आपल्यासो कर्तुत्वाने यशाची शिखरे सर केलेली आपणास पाहावयास मिळतात. सरांचे पहिले ते चौथीपर्यंतचे शिक्षण माळशिरस तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी येथे झाले. पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण संत गयाबाई मनमाडकर निराधार बाल आश्रम पंढरपूर येथे झाले. ज्यांना परिस्थितीची जाणीव असते, मनात जिद्द असते, ते मिळालेल्या संधीच सोनच करतात .याच युक्तीप्रमाणे अकरावी ते बीएपर्यंत शिक्षण सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेल्या रयत शिक्षण संस्थेत झाले. याबरोबरच आपल्या परिश्रमाच्या जोरावरती जिद्दीच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रातील बीए बीएड नामांकित बाळासाहेब खराडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय शिवाजी पेठ कोल्हापूर येथे पूर्ण केले.सरस्वतीच्या आशीर्वादाने व प्रकारी इच्छा शक्तीच्या जोरावर यश खेचून घेऊन नव्या आशीची सूर्यकिरणे घेऊन विद्याच्या पवित्र क्षेत्रात पदार्पण करीत ,1994 मध्ये श्री हनुमान विद्यामंदिर प्रशाला तोंडले येथे इंग्रजी व इतिहासाचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. विद्येच्या मंदिरात येणाऱ्या बहरणांऱ्या चिमुकल्यांना यशाचा मार्ग दाखवीत आपल्या शिक्षण क्षेत्राला आपल्या जीवनाचा एक भाग बनवणारे अशोक नायकोडे सर १/१०/२०२२ रोजी श्री हनुमान विद्या मंदिर प्रशाला तोंडले येथे मुख्याध्यापक पदी निवड झाली. आणि आजी ;माझी विद्यार्थी ग्रामस्थ, यांना विशेष आनंद झाला .जीवनात आलेल्या दुःखाचा बाजार न मांडता कष्ट, जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात हे त्यांनी दाखवून दिले! स्वतः शिक्षण घेत असताना असंख्य वादळांचा सामना करावा लागला ;परंतु गरिबीची जाणीव असल्यामुळे सरांनी आपल्या जीवनामध्ये आलेले दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, त्यांना एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून गोरगरीब विद्यार्थ्यांचे पालिकत्व स्वीकारून त्यांना मोफत वह्या पुस्तके शालेय गणवेश याबरोबरच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची विचारधारा घेऊन अभंगाची गोडी लावणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी आर्थिक मदत केली .त्यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, याबरोबरच वृक्षारोपण, रक्तदान हे जीवनदान आहे या संकल्पनेतून यशस्वी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. जे दुःख आपल्या वाट्याला आले ते इतरांच्या येऊ नये म्हणून अशोक नायकोडे सर्व नेहमी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करीत असतात. कारण गरिबीमुळे आपली क्षितेजे हरवून बसलेल्यांना सरांच्या आधारामुळे जीवनाचा एक जगण्याचा राजमार्ग मिळाला हे मात्र नक्की…! सरांनी हजारो विद्यार्थ्यांना पाठीवरती शब्बासकीची थाप देत खिलाडी वृत्तीने जीवनाचा स्वीकार करण्याचा मंत्र देऊन ;जगण्याचा एक यशस्वी मार्ग दाखवला .त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना ,पालकांना अशोक नायकोडे सर एक दीपस्तंभ वाटतात…. विजय चव्हाण.








Mi Tushar thakkar bhivandi
Ashramat hotomi dada maharaj
Manmadkar gayamata vidhya Mandir
Athe shikat hoto mi sir ji
7972639069
9270007071( wat )