*सर्व सामान्य जनतेसाठी सर्किट बेंच होणेकरिता सरकार दरबारी प्रयत्न करणार.सदाभाऊ खोत.*
कोल्हापूर दि ९ (केदार लोहकरे यांजकडून)सर्व सामान्य जनता,शेतकरी यांना जलद व स्वस्त न्याय मिळणे करीता लवकरच सरकार दरबारी प्रयत्न करणार.राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. सदाभाऊ खोत यांनी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ग्रंथालयमध्ये त्यांचा अध्यक्ष गिरीश खडके यांचे हस्ते शाल,पुस्तक,मोमेंटो देऊन सत्कार करणेत आला.यावेळी अध्यक्ष अँड गिरीश खडके,बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अँड विवेक घाटगे यांनी सर्किट बेंच स्थापने बाबत पाठपुरावा करावा म्हणून निवेदन दिले.अँड गिरीश खडके यांनी सर्किट बेंच मागणी अंतिम टप्यात आलेचे त्यांचे निदर्शनास आणून दिले. आपण सर्व सामान्य शेतकरी वर्गाचे नेतृत्व केले आहे आपल्याला या प्रश्नांची जाण आहे,सर्किट बेंच स्थापन होणे करीता राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे, तरी आपण मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की,मी स्पष्टपणे सरकार दरबारी या सर्किट बेंच मागणीची विचारणा करणार आहे.लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले. सदरवेळी सदाभाऊ खोत यांनी बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिले बद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी शेतकरी संघटनाचे नेते जालिंदर पाटील उपस्थित होते तसेच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अँड.सुशांत चेंडके,अँड.अमर गोनुगडे,अँड.वाय पी उगवे,अँड.श्रेणिक पाटील,अँड.धैर्यशील पोवार,अँड.विजय मालेकर आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.







