*क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातूनच आज मुलींना शैक्षणिक क्षेत्रात संधी प्राप्त झाल्या आहेत.प्रा.चंदारानी पाटील*
संग्रामनगर दि.३ (केदार लोहकरे यांजकडून)”क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातूनच आज मुलींना शैक्षणिक क्षेत्रात संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक कार्य सतत आठवणीत राहील,”असे प्रतिपादन येथील यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रा.चंदारानी उमेश पाटील यांनी आज येथे केले. कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते.या कार्यक्रमाची सुरुवात प्रा.चंदारानी पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील म्हणाले,”आज समाजातील विकृत माणसांनी शिक्षण व्यवस्था बिघडविली आहे त्यामुळे आज शिक्षण क्षेत्राची आबाळ झाली आहे.” यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,ग्रंथपाल,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी शिक्षक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका आदी उपस्थित होते.प्रथम वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक वैभव कुंभार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन केले.







