वेदत्री वेंचर एलएलपी कंपनी नातेपुते मधील गुंतवणूकदारांच्या फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक.7जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
अकलूज (प्रतिनिधी )नातेपुते पोलीस ठाणे येथील गु.र.नं.३८७/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ४०९, ४२०. सह एम. पी. आय. डी. कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील वेदत्री व्हेंचर एलएलपी नातेपुते या कंपनीने गुंतवणुकदारांना आकर्षीत करून गुंतवणुकदारांची विश्वासाने मोठया प्रमाणात गुंतवणुक केलेल्या रकमेचा परतावा देतो.असे सांगुन फिर्यादी तसेच फिर्यादी प्रमाणे इतर साक्षीदारांचे नोटरी करारा प्रमाणे ठेवींची गुंतवणुक रक्कमेची परतफेड केली नाही. त्यावरील दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच नोटरी करारा प्रमाणे काही परतावा, लाभांश देवून उर्वरित परतावा, लाभांश व गुंतवणुक केलेली ठेवीची रक्कम न देता फिर्यादी व साक्षीदार यांची एकुण ८६,७०,७९८/ रुपयाची कपटपूर्ण रितीने फसवणुक केली आहे. म्हणुन वेदत्री वेंचर कंपनीचे मालक १) संतोष दत्तु गुरव, रा. कोथळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा. कोथळे, ता. माळशिरस, ३) सचिन गेनु फुले, रा. मोरोची, ता. माळशिरस यांचे विरुद्ध वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाचे तपासादरम्यान यातील आरोपी १) संतोष दत्तु गुरव, रा. कोवळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा. कोथळे, ता. माळशिरस यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी दिनांक ०२/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना मा न्यायाधीश अति जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस यांचे समक्ष हजर केले असता, त्यांना दिनांक ०७/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.
चौकट :-
सोलापुर जिल्हा व इतर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकानी वेदत्री व्हेंचर एलएलपी नातेपुते कंपनीमध्ये गुंतवणुक केली असेल व ज्यांची फसवणुक झालेली असेल अशा गुंतवणुकदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलुज येथे संपर्क साधावा. तसेच या प्रकारच्याआकर्षक लाभ देणाऱ्या स्किमपासून लोकांनी सावध रहावे, कमी वेळेत जास्त नफा असल्या भुलथापांना बळी पडूनये. असा कोणताही प्रकार चालु असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा.
डॉ. बसवराज शिवपुजे.
उपविभागीय पोलीस अधिकारी.अकलूज
.सदरची कारवाई मा. शिरीष सरदेशपांडे सो. पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री हिंमत जाधय , अपर पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व श्री डॉ. बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग अकलूज यांचे नेतृत्वाखाली तपास पथकातील स. पो. नि. श्री सपांगे नातेपुते पोलीस ठाणे, पोहेकॉ समाधान देशमुख, पोहेका गणेश निंबाळकर, पोहेकॉ विकी घाडगे, पोना दत्ता खरात, पोना सचिन भोसले, पोकों/अजित कडाळे, पोकों अन्वर आतार सायबर शाखा यांनी कामगिरी बजावली आहे.







