माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड होणार-सुमित भोसले
अकलूज (प्रतिनिधी )महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्था चालू केल्या.वसतिगृह चालू केली. परंतु, आज त्याच शिक्षण संस्था स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी मोठं मोठ्या नेत्याची नावे घेऊन संस्था चालू करत आहेत. आणि त्याचा मलिदा खात आहेत.काही ठिकाणी तर बोगस शिक्षण संस्था, बोगस शिक्षक आणि त्या शिक्षकाच्या नावे बोगस कर्ज प्रकरण करून लाखो रुपयाचा घोटाळा या बोगस शिक्षण सम्राटांनी केला आहे. ज्या गरीब लोकांना शिक्षण मिळायला हवे त्यांना मिळत नाही.पण त्याच्या शिक्षणाचा च्या फिचा पैसा मात्र नक्कीच त्या शिक्षण सम्राटांना मिळत आहे. आणि हा सर्व घोटाळा येणाऱ्या आठ दिवसांत सर्वांन समोर येणार आहे. याचे सर्व पुरावे तयार करून जिल्हा अधिकारी, शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री यांना सादर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा वक्ता सेल चे कार्याध्यक्ष सुमित भोसले यांच्या वतीने देण्यात आली.







