मातंग संघर्ष समितीचा अकलूज प्रांतकार्यालयवर विविध मागण्यासाठी महामोर्चा
अकलूज (प्रतिनिधी ) – अकलूज येथील प्रांतकार्यालयावर २ जानेवारी रोजी सकळी १०:३० वा. साहित्यरत्न अण्णभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मातंग संघर्ष समितीचा विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांचेकडे महामोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये खालील प्रमाणे मागण्या मांडण्यात आल्या.१) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. २) क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिन १४ नोहेंबर हा दिवस शासकीय यादीत शासन निर्णयामध्ये नाव समाविष्ट करण्यात यावे. ३) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ थेट एक लाख कर्ज योजना सुरू केली आहे, परंतु यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्या. तसेच पूर्वीचे महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे. ४) ग्रामपंचायत अंतर्गत असणारे शासकीय गाळे मातंग समाजास देण्याबाबत क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग शिफारस क्रमांक १३ ची अमलबजावणी करण्यात यावी.५) माळशिरस तालुक्यातील मागासवर्गीय लोक गायरानात व इतर ठिकाणी अनेक वर्षापासून राहतात तरी या लोकांनसाठी नवीन गावठाण विस्तार वाढ करून त्यांना गावठाणातील जागेचे वाटप करण्यात यावी. ६) माळशिरस तालुक्यातील मातंग समाजातील अत्याचार पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, चुकीचे पत्र व माहिती देणाऱ्या मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.७) क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अंमलबजावणी व शिफारसू लागू केलेल्या शिफारशींचे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात यावे. ८) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह अकलूज येथे इमारत बांधण्यासाठी शासकीय जगा उपलब्ध नाही, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्या पत्रानुसार खाजगी जागा खरेदीची प्रक्रिया तात्काळ राबवून सुसज्ज असे वस्तीगृह बांधण्यात यावे.दरम्यान तालुक्यातील मातंग समाजातील विविध संघटनाचे,राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला तसेच सकल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












