अकलूज :- महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणेमध्ये भिडेवाडा येथे सुरू केली. या भिडेवाडा ऐतिहासिक वास्तूचे जतन व भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक शासन मान्य सन्मान करिता १ जानेवारी २०२३ रोजी पुणे येथे फुले दांपत्य सन्मान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केले. ते अकलूज – गणेशनगर येथील राजयोगी डेव्हलपर्स कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत माळी समाज बांधवासमोर ते बोलत होते. यावेळी माळी महासंघाचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नाना वाघमारे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रंगनाथ नाळे, महासंघाचे संस्थापक भारत माळी, माळी महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजीव बनकर, आधी इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माहिती देताना अविनाश ठाकरे यांनी सांगितले की, एक जानेवारी १८४८ पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळामध्ये प्रारंभि केवळ सहा मुली या शाळेमध्ये शिकत होत्या. १७५ वर्षांपूर्वी मुलींची शाळा महात्मा फुलेंनी पुण्यात सुरू केली. ही देशासह राज्यातील ९९ टक्के मुलींना व मुलींच्या पालकांना अजूनही माहिती नाही ही शोकांतिका असून ज्या समाजात फुले जन्माला आले त्याच समाजाला अजून फुले समजले नाहीत ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य भविष्यात प्रेरणादायी ठरावे म्हणून भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करिता फुले दांपत्य सन्मान रॅलीमध्ये पुणे येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अण्णासाहेब जावळे, जालिंदर फुले, भारत फुले, बाळासाहेब फुले, अरविंद राऊत, नितीन कुदळे, बाळासाहेब एकतपुरे, अनुज फुले, पिंटू एकतपुरे, अजिंक्य बनकर, राजकुमार राऊत, सुरज फुले, आधी मान्यवर व माळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







