2जानेवारी पासून अकलूज -वेळापूर रस्ता बंद होणार.पर्यायी मार्गाने वाहतूक करावी -पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे.
अकलूज :(प्रतिनिधी )अकलूज मधून प्रतापसिंह चौकातून वेळापूर ला जाणारा रस्ता पुढील काही दिवसांसाठी बंद राहणार असून,या मार्गांवरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले आहेत. इंदापूर -अकलूज- सांगोला रस्त्यावरील अकलूज येथील प्रतापसिंह चौकातील ओढ्यावरील पुलाची पुर्नबांधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता बंद ठेवावा. अशा प्रकारची विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज व अकलूज पोलिस स्टेशनच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांचेकडे करण्यात आली होती.त्यानुसार पोलिस अधिक्षकांनी जाहिरनामा प्रसिध्द करून 2जानेवारी 2023 रात्री 12 वाजलेपासून प्रतापसिंह चौकातील ओढ्यावरील पुलाची पुर्नबांधणी होईपर्यंत हा मार्ग बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या रस्त्यावरील प्रतापसिंह चौक अकलूज येथील ओढयावरील पुलाची पुर्नबांधणी होईपर्यंत वेळापूर व इंदापूर येथून प्रतापसिंह चौक अकलूज येथे येणारी सर्व प्रकारची वाहतुक वेळापूर शिवाजीनगर बायपास मसुदमळा मार्गे टेंभुर्णी व इंदापूर सराटी अकलूज बायपास रोड महर्षि चौक यशवंतनगर विझोरी मार्गे वेळापूर अशी वळवण्यात आली आहे.तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी. व सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.







