* “पावनखिंड” राज्यस्तरीय स्पर्धेत श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी तृतीय*
अकोले खुर्द, तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभूर्णी महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते व तृतीय वर्ष बी फार्मसी मधील विद्यार्थी तुषार दडस यांनी पावनखिंड रन राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये तृतीय क्रमांक पटकविल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन माढा तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ. पांडुरंग गायकवाड व डॉ. प्रवीण सीखरे यांनी केले. ही स्पर्धा मुख्य गट १० कि.मी. व हौशी गट ३ कि.मी. अशा दोन गटांमध्ये विभागली होती.या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट समाजाला आरोग्य व व्यायामाचे महत्त्व पटवून देणे होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी माढा तालुका डॉक्टर असोसिएशन चे महाविद्यालयाला उपक्रमात सहभागी केल्या बद्दल आभार व्यक्त केले व भविष्यात सहकार्यासाठी उपलब्ध असू असे आश्वासन दिले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्या. डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी प्रेरणा मिळेल. यावेळी श्री गणपती फार्मसी चे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. सुकुमार लांडे, प्रा. शिवराज ढगे व सर्व प्राध्यापक वर्गांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.







