• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

नागरिकांना त्रास देण्यासाठी खाकी वर्दी नाही -उच्च न्यायालय.अकलूज पोलीस ठाणेत रोहन काळे यांचेवर दाखल झालेला हेरगिरीचा गुन्हा रद्द.25हजाराचा दंड.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 26, 2022
in आपला जिल्हा
0
नागरिकांना त्रास देण्यासाठी खाकी वर्दी नाही -उच्च न्यायालय.अकलूज पोलीस ठाणेत रोहन काळे यांचेवर दाखल झालेला हेरगिरीचा गुन्हा रद्द.25हजाराचा दंड.
0
SHARES
453
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांना त्रास देण्यासाठी खाकी वर्दी नाही -उच्च न्यायालय.अकलूज पोलीस ठाणेत रोहन काळे यांचेवर दाखल झालेला हेरगिरीचा गुन्हा रद्द.25हजाराचा दंड.

अकलुज – (प्रतिनिधी )कायद्याचा मान सर्वांनी राखलाच पाहिजे.कायद्याचा गैरवापर कोणीही करू शकत नाही.कोणत्याही कायद्याचा वापर सर्वसामान्य नागरिकांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी वापरता येणार नाही.त्याचप्रमाणे हेरगिरीसाठी शिक्षेची तरतूद असणारे कलम विनाकारण उच्च शिक्षित व्यक्तीला लागू केल्यास एखाद्याच्या प्रतिष्ठा आणि त्याच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो.असे गंभीर ताशेरे उच्च न्यायालयाने पोलीस यंत्रणेवर ओढले आहेत.यासंदर्भात अधीक माहिती अशी की,पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये फोटो काढल्यानंतर पोलिसांनी हेरगिरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यावर तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला. शिवाय यातील तरुणाला २५ हजार रुपये देण्याचे तसेच गुन्हा नोंदविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या पगारातून हे पैसे वसूल करण्याचे आदेश दिले.विझोरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रोहन तुकाराम काळे यांना २७ जुलै २०२१ रोजी शेतीच्या वादात अकलूज पोलीस ठाणे येथे चौकशीसाठी बोलावले होते. रोहन काळे यांची ज्या व्यक्तीबाबत तक्रार होती, त्या व्यक्तीसोबत पोलिस ठाण्यातील पोलिस हे  चर्चा करत थांबले होते. यावेळी बाहेर चर्चा करत असलेल्या पोलिस आणि इतरांचे फोटो काढल्याचा प्रकार लक्षात आलेले पोलिस शिपाई सोमनाथ कोळी यांनी काळे यांचा मोबाइल फोन तपासला. यावेळी काळे यांच्या मोबाइलमध्ये पोलिस ठाण्याच्या बाहेर थांबलेल्या लोकांचे छायाचित्र आढळले होते. यानंतर पोलिसांनी रोहन काळे यांच्याविरुद्ध गुप्त कायदा १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी काळे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने हेरगिरीचे आरोप वगळून खटला रद्द करत रोहन काळे यांना २५ हजार रुपये देण्यास राज्य सरकारला सांगितले.

न्यायालयाने नोंदविलेले मत :-

हेरगिरीसाठी शिक्षेची तरतूद करणारे कलम लागू केल्यास व्यक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याचा परिणाम एखाद्याच्या प्रतिष्ठा, नोकरी, करिअरवर होऊ शकतो. एखाद्याचे जीवन व करिअर धोक्यात आणणे हे हलकेच समजले जाऊ शकत नाही. कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही.आणि लोकांना त्रास देण्यासाठी किंवा छळण्याचे साधन म्हणून वापरता कामा नये, गोपनीयतेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणाची जी व्याख्या आहे. त्यात पोलीस ठाणे चा समावेश नाही.ज्यांनी तक्रार केली त्या व्यक्तीचा वाद असलेल्या व्यक्ती बरोबर संबंधित पोलीस मैत्री असल्यासारखे संवाद साधतं होते.हे दाखविण्यासाठीच तक्रारदाराने ते छायाचित्र काढले होते.या छायाचित्रावरून पोलिसांनी तक्रार कशी दाखल केली.नागरिकांचे संरक्षण करणे आणि कायद्याचे पालन करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे.या प्रकरणात कायद्याचा पूर्णपणे गैरवापर झाला आहे.असे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट चा गैरवापर होणार नाही.यासाठी गृह विभाग योग्य ती पावले उचलील.आम्हाला अनेकवेळा अशा प्रकारची प्रकरणे आढळून आली आहेत.ज्यात पोलीस कोणतीही शहानिशा न करता हेरगिरी चे गुन्हे नोंदवित आहेत.असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले.

चौकट :-

तरुणाने न्यायालयाची लढाई जिंकली.रोहन तुकाराम काळे आणि त्यांच्या भावकीत जमिनीचा वाद चालू आहे.त्यातून झालेल्या भांडणात त्यांचेवर अकलूज पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यासाठी ते पोलीस ठाणेत गेले होते.त्यावेळी त्यांचेवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांचेवर झालेल्या अन्यायासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.आणि न्यायालयाने देखील त्यांची बाजू समजून घेऊन योग्य तो निकाल दिला.त्यांनी दिलेला लढा यशस्वी ठरला.रोहन हे स्वतः उच्च शिक्षित आहेत.त्यांचा पुण्यात बांधकाम व्यवसाय आहे.त्यांनी कॉम्प्युटर इंजिनियर चे शिक्षण घेतले असून,मार्केटिंग मध्ये एम. बी. ए केले आहे.यासंदर्भात त्यांना मोबाईल वरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की,मी अर्ज केलेल्या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला संरक्षण देणे अपेक्षित होते.जमीन मोजणीसाठी आवश्यक असणारी फि आम्ही संबंधित कार्यालयाकडे रीतसर भरली होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त घेतला होता.मात्र पोलिसांनी संरक्षण न देता केवळ बघ्याची भूमिका घेतली.मात्र माझी कोणतीही चूक नसताना माझेवर दुसरा गुन्हा दाखल केला.दरम्यान यावेळी पोलिसांच्या कामगिरीत काही गैरप्रकार होत असल्याचा संशय आला.त्याला वाचा फोडणे गरजेचे होते.माझी कोणतीही चूक नसताना मी अन्याय का सहन करायचा?या भावनेतून मी न्यायालयात गेलो.न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून,त्यांनी मला पूर्ण न्याय दिला. याचा मला आनंद आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या यंत्रनेत उचित बदल होणे गरजेचे आहे.

रोहन तुकाराम काळे.याचिकाकर्ते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
“पावनखिंड” राज्यस्तरीय स्पर्धेत श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी तृतीय*

“पावनखिंड” राज्यस्तरीय स्पर्धेत श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी तृतीय*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In