महाळुंग श्रीपूर नगरपंचायत श्रीपूर महाळुंग चा विकासाचा नेमका आराखडा का निश्चित करत नाही बी टी शिवशरणमहाळुंग श्रीपूर नगरपंचायत सत्तेत येऊन वर्ष होत आहे मात्र नगरपंचायत प्रारूप आराखडा व गावाचे नेमके विकासाचे निश्चित धोरण अद्याप का जाहीर करत नाही हा येथील नागरिकांच्या मनातील ज्वलंत प्रश्न आहे रस्ते पानी स्वछता या बरोबरच अतिक्रमने हे विषय महत्वाचे आहेत श्रीपूर परिसरात एकही रस्ता व्यवस्थित सुरक्षित राहिलेला नाही गावाला कसलाही आकार उकार रूपरेषा उरलेली नाही गाव सुंदर परिपूर्ण करण्यासाठी नगरपंचायत माध्यमातून विकासाचे धोरण नागरिकांच्या सहकार्यातून राबवून विकास करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहे महाळुंग मंडळ मधील चौदा गाव माढा विधानसभा मतदार संघात जोडली आहेत या भागाचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून नगरपंचायतला विकासनिधी बाबत सहकार्य होते की नाही निश्चित माहिती नाही कारण माळशिरस चे विद्यमान आमदार तसेच विधान परिषद आमदार यांनी वर्षभरात भरघोष निधी अकलूज नगरपरिषद माळशिरस नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत ला उपलब्ध केल्याची माहिती माध्यमातून ऐकायला मिळते मात्र या भागाचे आमदार यांच्या माध्यमातून महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ला विकास निधी किती उपलब्ध झाला हे नगरपंचायत कडून किंवा अन्य माध्यमातून समजतं नाही स्थानिक राजकारण किंवा विरोधी गटबाजी काहीका असेना गावचा विकास व प्रगती झाली पाहिजे या रास्त अपेक्षा नागरिकांच्या आहेत







