अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील *भाजपचे लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील* यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यावरील चर्चेवेळेस सोलापूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे तसेच प्रशासकीय कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत मागणी केली..*आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे* पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील प्रमुख घटक आहे. सद्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे उपोषणाला बसले आहेत. सद्या राज्यातील पोलीस पाटलांना ६५०० रुपये एवढे मानधन मिळते ते तटपुंजे असुन त्यात वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे पोलीस पाटलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाण्यासह बंदुक देण्यासाठी तरतुद करण्यात यावी.कृष्णा खोऱ्यातील महापुराचे पाणी मराठवाडयाकडे वळविण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला असुन मराठवाडयातील दुष्काळी भागाला पाणी देणेसाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणांतर्गत ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कृष्णेचे अतिरिक्त पाणी उजनीत सोडण्याच्या दृष्टीने कृष्णेतुन निरा नदीत पाणी आणण्याच्या टप्प्याला अजुनही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यासंदर्भात तरतुद करण्यात यावी.पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील पुणे, सोलापूर, सातारा जिल्हयांना लाभ होणाऱ्या निरा देवधर प्रकल्पाची कामे सध्या रखडलेली आहेत. या प्रकल्पाच्या उजवा कालवा, डावा कालवा, बंदिस्त पाईपलाईन व वितरण प्रणाली तसेच गावडेवाडी उपसा सिंचन योजना, शेखमीरवाडी उपसा सिंचन योजना, वाघोशी उपसा सिंचन योजना या कामांसाठी ३९७६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. त्यासंदर्भात तरतुद करण्यात यावी.मोहोळ तालुक्यातील २५०० हेक्टर वर पसरलेल्या व सुमारे १ TMC पाणी साठवण क्षमतेच्या ऐतिहासिक आष्टी तलावाच्या भराव्याला मोठया भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बंधारा खचत चालला आहे. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती व कालव्याची अपुर्ण कामे यासाठी १०० कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असुन त्याची लाक्षणिक तरतुद करण्यात यावी.माळशिरस तालुक्यातील निरा नदीवरील गणेशगाव व संगम को. प. बंधारा तसेच भिमा नदीवरील वाफेगाव, मिरे, जांबुड येथील को.प.बंधाऱ्यांची अतिरिक्त पावसामुळे भराव वाहून जाणे, संरक्षण भिंत तुटणे व दरवाज्यांचे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. त्याची लाक्षणिक तरतुद करण्यात यावी.मौजे माढा, ता. माढा, जि. सोलापुर येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांचेकडुन मंजुरी मिळाली आहे, तरी माढा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करुन पद निर्मीती करण्याबाबत शासनाने तरतुद करावी.माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन २०२३ अखेर पर्यंत काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायाधिशांचे निवासस्थान, न्यायालयीन इमारतीचे फर्निचर, ग्रंथालय, कॅन्टीन या उर्वरित कामांसाठी अजुनही निधीची गरज आहे. त्याची लाक्षणिक तरतुद करण्यात यावी.करमाळा तालुक्यातील केम ग्रामीण रुग्णालय ३० बेड, बार्शी तालुक्यातील वैराग येथे ३० बेड, . माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ५० बेड याप्रमाणे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्यास मंजुरी मिळुन आर्थिक तरतुद करण्यात यावी.सोलापुर जिल्हयामध्ये लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार जनआरोग्य अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून २२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ६८ प्राथमिक उपकेंद्रांची गरज असुन, जिल्हा परिषद सोलापुर आरोग्य विभागामार्फत त्याचा आराखडा राज्याच्या आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला असुन त्यास मंजुरी मिळुन त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात यावी.अशा विविध मागण्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यावरील चर्चेवेळेस सोलापूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे तसेच प्रशासकीय कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत मागणी केली







