समुह साधन केंद्र अकलूजच्या क्रीडा स्पर्धा संपन्न !अकलूज:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांची ओळख होऊन कौशल्ये प्राप्त व्हावीत, खिलाडू वृत्ती निर्माण होऊन क्रीडा नैपुण्य वाढावे यासाठी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी केले होते.त्यानुसार समुहसाधन केंद्र अकलूजने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख व केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या होत्या.पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा जि. प. प्रा.शाळा मुले नं. २ व जि. प. प्रा. शाळा मुली नं.३च्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे व अकलूज बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सुरुवातीला स्पर्धकांना खेळांच्या नियम व अटी विषयीची शपथ देण्यात आली.सांघिक प्रकारात कबड्डी, लंगडी,खो-खो व वैयक्तिक प्रकारात १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे व बुद्धिबळ या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे सांघिक—- लहान गट१)लंगडी मुले विजेता .. जि.प. शाळा, पवार वस्तीलंगडी मुली विजेता… जि. प. शाळा, दत्तनगर २)कबड्डी मुले विजेता… जि.प.शाळा मुले २कबड्डी मुली विजेता.. जि. प. शाळा, दत्तनगर ३)खो-खो मुले विजेता… जि.प.शाळा,मुले २खो-खो मुली विजेता… जि. प.शाळा,मुली ३वैयक्तिक क्रीडा प्रकार १)१००/२००मीटर धावणे मुले प्रथम -अमृत देवकर जि. प. प्रा. शाळा, मुले १,द्वितीय- प्रणव वाडेकर जि. प. प्रा.शाळा, मुले १,तृतीय- यश महेश मुळकुटे जि. प. प्रा. शाळा,मुले २१००/२००मीटर धावणे मुली प्रथम- श्रावणी दोरकर जि. प. प्रा. शाळा,दत्तनगर ,द्वितीय- महादेवी वाईकर जि. प. प्रा. शाळा,मुली २,तृतीय -दिव्या खिलारे जि. प. प्रा. शाळा,मुली ३सांघिक —-मोठा गट १)लंगडी मुली विजेता… जि. प. शाळा, मुले २लंगडी मुली विजेता… जि.प.शाळा,मुली ३ २)कबड्डी मुले विजेता..जि. प. शाळा, दत्तनगर कबड्डी मुली विजेता ..जि. प. शाळा, .मुली ३ ३)खोखो मुले विजेता..जि. प. शाळा, मुले २ खो खो मुली विजेता…जि. प. शाळा, मुली ३ वैयक्तिक १००/२००मीटर धावणे १)मुले प्रथम -रुद्र खंडागळे. जि. प. शाळा, मुले२,द्वितीय-(विभागून)वल्लभ धोत्रे जि. प. शाळा मुले ४ – सिद्धराज भोसले जि. प.प्रा.शाळा,दत्तनगर२) १००/२०० मीटर धावणे मुली प्रथम -धनश्री पवार जि. प. शाळा, मुली ३,द्वितीय (विभागून)गायत्री मोहिते जि. प. शाळा, दत्तनगर -तनुजा ऐवळे जि. प. शाळा, मुली २२०० मीटर धावणे प्रथम -वैष्णवी पवार जि. प. शाळा, मुली १स्पर्धेचे पंच म्हणून संतोष जोशी,पांडुरंग गायकवाड, नितीन बनकर, श्रीकांत राऊत,शहजादी काझी, उमेश फलटणकर,संतोष यादव व सुरज कांबळे यांनी काम पाहिले.क्रीडा स्पर्धेचे धावते समालोचन विलास मगर व कैलास गायकवाड यांनी केले.स्पर्धेचे चित्रीकरण संध्या नाचणे यांनी केले.स्पर्धेचे नियोजन व आयोजन यामध्ये पांडुरंग मोहिते, महादेव नागणे, रामचंद्र केसकर व त्यांच्या सहकारी शिक्षक शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.मुख्याध्यापिका सुकुमारी अंगुले व मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे यांच्या देखरेखीखाली क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.











