जयश्री इंगळे यांनी मानले मतदारांचे आभार .
वार्ताहार : ग्रामपंचायत २०२२ मधे संगम गावचे मतदान रविवार दिनांक १८डिसेंबर २०२२ ला पार पडले. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक ३ मधून जयश्री इंगळे या सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या . निवडणुकी मधे हार जित ही होतच असते .पण हार जित होण्या आधीच जयश्री इंगळे यांनी सोमवार दि १९ डिसेंबर ला वार्ड क्रमांक तीन मधे जाऊन ज्यांनी मतदान दिले आणि ज्यांनी मतदान दिले नाही अशा प्रत्येक मतदारांचे आभार मानले जयश्री इंगळे ह्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या सुवेद्य पत्नी आहेत .मतमोजणीच्या आधीच मतदारांचे प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन गुलाब पुष्प देऊन आभार मानून जनतेच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. संगम गावचे मतदान १९४४ पैकी १७२२ झाले असून वार्ड क्रमांक तीन मधे ७३४पैकी ६६८ मतदान झाले आहे








