माळशिरस तालुका ग्राहक प्रबोधन सप्ताहाचा शुभारंभ:
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ज्येष्ठ नागरिक संघ यांचे संयुक्त विद्यमाने माळशिरस येथे आज अमेरिकास्थित असलेले डॉक्टर राजेश वाघमोडे व डॉ.सौ.वाघमोडे यांचे हस्ते ग्राहक प्रबोधन सप्ताहाचा शुभारंभ करणेत आला.या मध्ये आठवडाभर ग्राहक प्रबोधनपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे ग्राहक पंचायती कडून कळविण्यात आले.याचाच एक भाग म्हणून आज अमेरिकेतील आरोग्य व्यवस्था या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच अमेरिकेतील ग्राहक स्वातंत्र्य, राजकीय व्यवस्था, शेती, शिक्षण,सामाजिक व्यवस्था,संस्कृती या सर्व विषयांचा ऊहापोह केला.तसेच या नंतर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला.या नंतर राष्ट्रीय ग्राहक दीन शुभेच्छा फ्लेक्स चे अनावरण ही करण्यात आले.या वेळी तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर,उपाध्यक्ष वामनराव वाघमोडे,सचिव महादेव भोसले,धोंडिराम म्हस्के,हारून शेख,सचिन पवार,सतीश भोसले,पत्रकार तानाजी वाघमोडे,संजय हुलगे ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.









