*उत्तम जानकरांचा रात्रीत काळाबाजार ?
*वेळापूर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक ४ मध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडून देण्यात येणारे शासनाची योजना असलेल्या बांधकाम कामगार पेटी साहीत्य योजनेतून किटचे आचार वाटप करत असताना सतिश चव्हाण व अन्य कार्यकर्त्यांनी आचारसंहीता काळात शासनाचे कोणतेही साहीत्य योजनेचा लाभ वाटप करता येत नाही म्हणून हटकले असता ,टेम्पोचालक टेम्पो सहीत उत्तम जानकरांच्या निवासस्थानी जाऊन थांबला असल्याचे आढळले.त्यावेळेस जानकर व जानकर गटाच्या समोर माने देशमुख व मोहिते-पाटील गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण बनले होते.या प्रसंगी सतिश चव्हाण माने देशमुख व मोहिते-पाटील गटाकडून वेळापूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता,वेळापूर पोलीस स्टेशन ने संबधित साहीत्य वाटप करणारा टेम्पो व टेम्पोचालक व इतर लोकांना सोडून दिले, पुन्हा एकदा टेम्पो मधून साहित्य वाटप होत असल्याचे आढळून आले असता, पोलिसांना संपर्क साधला असता बघ्याची भूमिका घेतली, आम्ही या चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही.म्हणून वेळापूर पोलिसांवर दबाव आणून संबंधितावर कारवाईसाठी डीवायसपी यांच्याकडे तक्रार करून संबधिताना ताब्यात घेण्यास भाग पाडले असल्याचे सतिश चव्हाण व माने देशमुख गटाकडून सांगण्यात आले.
वेळापूर पोलीसांची भूमिका संशयास्पद?
सतिश चव्हाण यांनी वेळापूर पोलीस स्टेशनच्या API निलेश बागाव यांना पहींल्या गैरप्रकार होतोय यांची कल्पना देऊन सुद्धा गैरप्रकार थांबवण्यास टाळाटाळ करण्यात आली, साहीत्य वाटप झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर पोलीसांनी केलेली कारवाई म्हणजे नुसता फार्सच म्हणावा लागेल.येथे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो निवडणूक आचारसंहिता काळात शासकीय योजनांचा लाभ देता येत नाही किंवा साहीत्य वाटप करता येऊ शकत नाही हे पोलिसांना माहिती नाही का ? निवडणूक काळात कर्तव्यात कसूर म्हणून सोलापूर जिल्हा अधीक्षकांनी वेळापूर API वर चौकशी नेमण्यात यावी..जानकरांचा काळ्याबाजारात पण खोटे पणा शासनाच्या योजनेचे बांधकाम साहीत्य स्वःवाटप करत असल्याचे सांगून गैरप्रकारातला गैरप्रकार केला गेला आहे.उत्तम जानकर निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास येत आहेत , बांधकाम साहीत्य टेम्पो पकडल्याचे वीडीओ सोशल मीडीयावर वायरल होताना देखील दिसत आहेत.









