माळशिरस तालुक्यातील वटपळी येथील श्री.संपतराव बाळासाहेब वगरे दादा यांनी आज रविवार दिनांक १८/१२/२०२२ रोजी दुपारी ठीक ३:३३ वाजता पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमधील ह्रदय विकारावरील उपचार सुरू असताना वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, चार नातू, चार नाती असा परिवार आहे,
ग्रामविकास अधिकारी हनुमंतराव वगरे यांचे ते वडील होते.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






