जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 20डिसेंबर रोजी शिवपुरी येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन -सतीश (तात्या )ढेकळे
अकलूज (प्रतिनिधी )सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 20डिसेंबर रोजी सकाळी 11वाजता प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी (ऐकशीव )येथे भव्य महिला मेळाव्या चे आयोजन केल्याची माहिती आयोजक ऐकशीव येथील उद्योजक सतीश (तात्या )ढेकळे यांनी दिली .सदर मेळाव्याचे उदघाटन जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील व सामाजिक कार्यकर्त्यां व माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते,यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष शहाजीराजे (बाबाराजे )देशमुख हे आहेत.या मेळाव्या साठी कृषि उत्पन्न बाजार समिती अकलूज चे उपसभापती मामासाहेब पांढरे,सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन ऍड. प्रकाश पाटील,नातेपुते पोलीस ठाणे चे पोलीस उप निरीक्षक सपांगे,माळशिरस पंचायत समिती चे उपसभापती प्रताप पाटील,माळशिरस तालुका भाजपा चे अध्यक्ष बाजीराव काटकर,अकलूज येथील विजयरत्न पशुपक्षी संवर्धन संस्था अकलूज चे चेअरमन दत्तात्रय भिलारे,माळशिरस पंचायत समिती सदस्य व उद्योजक दयानंद शेळके,यशोदीप लो. लं.साधन केंद्र चे व्यवस्थापक प्रताप वाघमोडे,विजयरत्न पशुपक्षी संवर्धन संस्था अकलूज चे व्हा. चेअरमन व ऐकशीव चे मा. सरपंच शहाजी दादा धायगुडे,ऐकशीव ग्रामपंचायत च्या महिला सरपंच सौ. शिल्पा रणजित पाटील,हनुमानवाडी ग्रामपंचायत च्या महिला सरपंच सौ. सुरेखा विनोद हुंबे,पिरळे ग्रामपंचायत च्या महिला सरपंच अलका रामलिंग नरुळे,कुरबावी ग्रामपंचायत च्या महिला सरपंच सौ. प्रिया नितीन रुपनवर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी पिरळे,कळंबोली, ऐकशीव, पळसमंडळ,बांगर्डे, कुरबावी, फोंडशीरस, देशमुखवाडी,दहिगाव, हनुमानवाडी,शिंदेवाडी,डोंबाळवाडी, गुरसाळे,येथील सरपंच, उप सरपंच,ग्रामस्थ व मित्र परिवार परिश्रम घेत आहेत.या मेळाव्या साठी परिसरातील महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक सतीश (तात्या )ढेकळे यांनी केले आहे.






