पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत सर्व मर्यादा ओलांडल्या आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर अशोभनीय टीका केली भुट्टोच्या निंदनीय वक्तव्याचा त्याचा निषेध करावा तितका कमी आहे.. हा भारताचा अपमान आहे.बिलावल भुट्टो, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या निषेधार्ह उद्धटपणामुळे उतावीळ वक्तव्यामुळे तमाम भारत देशवासीय संतापले असून *आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व संघटन मंत्री धैर्यशिल मोहिते-पाटील* यांच्या नेतृत्वात अकलूज येथे बिलावल भुट्टोचा पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला.यावेळेस किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, राजकुमार पाटील,बाळासाहेब नारनवर ,बाजीराव काटकर,बाळासाहेब पराडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते देशप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

















