*सत्यजित चव्हाण याची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनसाठी निवड*
संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे यांजकडून)येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी सत्यजित बाळू चव्हाण या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी 2023 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली आहे.त्याच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंंह मोहिते पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. दिनांक २० ते २९ नोव्हेबर 2022 दरम्यान गुजरात येथे झालेल्या सराव शिबिरातून 256 विद्यार्थ्यातून महाराष्ट्रातील 14 विद्यार्थी निवडण्यात आले आहे.त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाज प्रबोधनपर उपक्रम राबवून जनजागृती केली आहे व महाविद्यालयाचा नावलौकिक केला आहे. त्याच्या या यशाबद्दल सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील,संस्थेच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय मगर,डॉ.सविता सातपुते,प्रा.सज्जन पवार,डॉ.चंकेश्वर लोंढे महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यास शुभेच्छा दिल्या व त्याचे विशेष अभिनंदन केले.









