*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे कार्य कौतुकास्पद -किशोरसिंह माने पाटील.*
*अकलूज येथे मानवाधिकार दिन साजरा.*
अकलूज (प्रतिनिधी )अकलुज येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतिने 10 डिसेंबर राष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला .सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने -पाटील, शिवामृत दूध संघाचे संचालक बाळासाहेब पराडे- पाटील, पत्रकार गणेश जाधव.उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना किशोरसिंह माने पाटील म्हणाले की,सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे कार्य कौतुकास्पद असून, या संघाच्या माध्यमातून अनेक विधायक कामे करण्यात आली आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या विविध समस्या प्रामाणिकपणे सोडविण्यात आल्या आहेत.यावेळी बाळासाहेब पराडे -पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.या संघाने आजपर्यंत केलेली सर्व कामे चांगली असून, भविष्यात देखील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामे करावीत. असे आवर्जून सांगितले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून अकलूज परिसरातील अंगणवाडी मधील बालकांना शालेय साहित्य ,पाटील पेन्सिल,अंकलिपी वाटप करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 150 नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले.हा कार्यक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. मानवाधिकार याविषयी बोलताना पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी सांगितले की,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा संयुक्त राष्ट्राने 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. समाजामध्ये मानवाला मानव म्हणून जगता यावे यासाठी संयुक्त राष्ट्राने पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्था ही प्रामुख्याने मानवाधिकारावरती काम करत असून, महिला अत्याचार, बालकामगार, भ्रष्टाचार, शारीरिक शोषणाच्या विरोधात व समाजातील होणारे अन्याय अत्याचाराचा विरोधात हे संघ संस्था सामाजिक हिताच्या कार्यासाठी काम करत असते.आज संपूर्ण महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश व इतर राज्यांमध्ये जोमाने काम चालू असून सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका अकलूज शहरात बरेच पुरुष व महिला पदाधिकारी, सर्व सदस्य तत्परतेने काम करीत आहेत.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने, पांचाळ सोनार समाज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष महेश भास्करे,अकलूज शहराध्यक्ष समीर कोथमीरे,अकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार,संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके ,माळशिरस तालुका महिला अध्यक्ष शोभा दळवी,माळशिरस तालुका महिला उपाध्यक्ष अश्विनी पांढरे, पुणे जिल्हा अध्यक्ष शुभांगी मोरे,माढा तालुका महिला अध्यक्ष वनिता वजाळे, सदस्य पोर्णिमा अवचारे यांनी परिश्रम घेतले.





















