अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी अनधिकृत बांधकामे न करता नियमीतीकरण करून घ्यावे-मुख्याधिकारी दयानंद गोरे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद नवनिर्मित नगरपरिषद असल्याने तसेच तांत्रिक कर्मचारी नियुक्ती अभावी नगर परिषद हद्दीतील बांधकाम परवानगी तसेच गुंठेवारी प्रकरणे निकाली काढण्यास समस्या येत होती. परंतु आता पंढरपूर नगरपरिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार यांनी अकलूज नगरपरिषद चा अतिरिक्त पदभार घेतल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली निघत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच बांधकाम परवानगी घेऊनच नागरिकांनी बांधकामे चालू करावीत व आपले सन 2020 पूर्वी खरेदी केलेले प्लॉटस आणि करण्यात आलेली बांधकामे ही नियमीत करून घ्यावीत.नगरपरिषद अधिनियमानुसार सन 2023 पासून अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कराच्या दुप्पट अशी शास्ती लावण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकामे न करता नियमीतीकरण करून घ्यावे.असे आवाहन अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.






