*शिवरत्न मध्ये “माॅडेल ऑफ युनायटेड नेशन असेंब्ली” कार्यक्रम*
अकलूज: नऊ राष्ट्रे.. व त्यांचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी… ज्युरी… व त्यांच्यासमोर युक्रेन व रशिया या देशांमध्ये होत असलेल्या युद्धामुळे झालेले नुकसान व दुष्परिणाम या विषयांवर चर्चा …. चर्चेतून उपाय योजना..जणू काही संयुक्त राष्ट्र संघाच्या लवादमंडळाची असेंब्ली अवतरल्याची प्रचीती , शिवरत्न नाॅलेज सिटी येथिल संकुलातील सभागृहात आली. अकलूजच्या रोटरी क्लब तर्फे ‘माॅडेल ऑफ युनायटेड नेशन असेंब्ली’ हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र संघाच्या असेंब्लीत आंतरराष्ट्रीय समस्यांवर चालणाऱ्या कामकाजाची पद्धत महाविद्यालयातील युवकांना माहिती व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भारत, रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इराण व जर्मनी या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आठ दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर चर्चात्मक असेंब्लीची प्रतिकृती, संकुलातील विजयसिंह मोहिते- पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि ग्रीन फिंगर कॉलेज ऑफ कम्प्युटर टेक्नोलॉजी या महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. प्रशिक्षित विद्यार्थी प्रतिनिधींनी युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धामुळे होणारे नुकसान व परिणाम या विषयांवर उत्तम व स्पर्धात्मक चर्चा केली . या चर्चेत उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धात्मक चर्चेच्या परीक्षणाचे काम रोटरीचे ज्युरी या भूमिकेतून जिल्हा अध्यक्ष दिलीप प्रभुणे, प्राचार्य डॉ.अरविंद कुंभार व अश्रफ शेख यांनी पाहिले. कार्यक्रमांती असेंब्ली प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा रोटरी अध्यक्ष दिलीप प्रभुणे, माळशिरस रोटरी अध्यक्ष ॲड. दीपक फडे, सचिव केतन बोरावके, संस्थेचे प्रशासन अधिकारी अश्रफ शेख, प्राचार्य डॉ.अरविंद कुंभार, उपप्राचार्य शिवतेज हिरेमठ, समन्वयक संजय साळुंखे व रोटरी क्लबचे पदाधिकारी कल्पेश पांढरे,ओझस दोभाडा, अजित वीर, आशिष गांधी, नितिन कुदळे, सुशील व्होरा, बबनराव शेंडगे, अमित सोनाज, सकल दोशी, गुरुदेव वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुक्याचे भाग्यविधाते कै. शंकरराव मोहिते पाटील व कै. अक्कासाहेब यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. अकलूज रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. दीपक फडे यांनी प्रास्ताविक केले. साताऱ्याचे रोटरीचे जिल्हा समन्वयक आंतरराष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक प्रभुणे यांनी उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. शिवरत्न शिक्षण संस्थेविषयी व संस्थेत चालणाऱ्या उपक्रमांविषयी प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन सुशील दोशी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन गजानन जवंजाळ यांनी केले. ग्रीन फिंगरचे अनिल लोंढे यांनी आभार मानले. या कार्याक्रमाला तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
~~~रोटरी क्लब ऑफ अकलूज व शिवरत्न शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित केलेला हा कार्यक्रम नाविण्यपूर्ण असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल. त्यांना आंतरराष्ट्रीय समस्यांवर चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळाली व त्यांना सदर त्याची करियर घडविण्यासाठी उपयुक्त आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थी देशपातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील. –
धैर्यशील मोहिते-पाटील, अध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज.












