*श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न*
अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये शिक्षक -पालक सभा घेण्यात आली. शिक्षक व पालक यांच्यामध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा पालकांसमोर मांडणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक प्रतिनिधी म्हणून मा. प्राचार्य श्री. दयानंद लोखंडे व सौ. वैशाली गायकवाड, महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रा. शिवराज ढगे यांनी महाविद्यालयाची तसेच महाविद्यालयात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांचा निकाल याबद्दल माहिती पालकांना दिली. यावेळी संस्थेच्या सचिवांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. पालक प्रतिनिधी श्री दयानंद लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविद्यालयाने खूप कमी वेळामध्ये मोठी प्रगती केली आहे. या ग्रामीण विभागात असणारी उच्च शिक्षणाची गरज ही या महाविद्यालयाने पूर्ण केली आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी विध्यार्थ्यांच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला आणि विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आव्हान दिले. पालकांमधून पंडित पाटील, सुहास कुटे यांनी हितगुज केले. यावेळी संस्थेचे सचिव.डॉ.आर.डी.बेंदगुडे,अध्यक्ष अॅड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ व पालक उपस्थित होते. प्रा. महादेवी भोसले व प्रा. सुकुमार लांडे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले. प्रा. रेणुका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. गंगा गोरे यांनी आभार प्रदर्शन केले.







