*सक्षम दिवाणी न्यायालयाने पारित केलेला हुकूमनामा दुय्यम निबंधकाकडे नोंदवण्याची आवश्यकता नाही* संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)सक्षम दिवाणी न्यायालयाचे हुकूमनामे उदा वाटणीचा, हक्कज्ञापन,तडजोड हुकूमनामा वगैरे या हुकूमनाम्याचे संबंधित व्यक्तीला प्राप्त झालेल्या हक्काच्या नोंदी महसूल रेकॉर्डला व सिटी सर्व्हे रेकॉर्डला नोंदवत असतात या हुकूमनामेचे नोंदी संबंधित रेकॉर्डला इतर कायद्याच्या तरतुदींना आधीन राहून संबंधित अधिका-यांनी या नोंदी घातल्या पाहिजेत . दिवाणी न्यायालयाचे हुकूमनामा याची नोंद दुय्यम निबंधकाकडे करणे वैकल्पिक आहे.दिवाणी न्यायालयातील हुकनाम्याच्या नोंदी महसूल पत्रकी अथवा सिटी सर्व्हे पत्रकी करताना संबंधित अधिकारी यांना हे दिवाणी हुकूमनामे नोंदणी कायद्यानुसार नोंदवले पाहिजेत असा आग्रह धरता येणार नाही. याबाबतचे भूमिका असणारे पत्र मल्लिकार्जुन माने सहाय्यक निंबंधक वर्ग -1 व जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला दिले.याबाबतचा पाठपुरावा जिल्हा बार असोसिएशने मा. जिल्हाधिकारी डॉ.राहुल रेखावार यांचे कडे केला असता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना केले सुचने नुसार तसे पत्र मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी आज बार असोसिएशनला दिले आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 149, व कलम 150 प्रमाणे दिवाणी न्यायालयातील हुकूमनाम्याची नोंद करणे बंधनकारक होते परंतु हे हुकमनामे रितसर नोंदणी करणेचा आग्रह संबंधित रेव्हिन्यू अधिकारी यांचे कडुन होत होता.परंतु सदरचा पत्रामुळे दिवाणी न्यायालयाचे हुकूमनाम्यातून निर्माण झालेल्या हक्काचा नोंदी महसूल व सिटी सर्व्हे दप्तरी करणे सुलभ होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने व उप जिल्हा निंबंधक आर.आर.माने यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीष खडके,उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांना आज सदरचे पत्र दिले. यावेळी सिनियर वकील अॅड.अजित हुक्केरी,अॅड.सुशांत चेंडके,अॅड.विजय कसबेकर,अॅड.जीवन पाटील उपस्थित होते.







