*परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण महत्वाचे.-संजय बडे*
संग्रामनगर दि.७(केदार लोहकरे यांजकडून) शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित श्री हनुमान विद्यालय लवंग येथे भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी यांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लवंग शाखेचे शाखाधिकारी संजय बडे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना संजय बडे म्हणाले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या परंतु जिद्द चिकाटी व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सर्व अडचणीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना आपली परिस्थिती बदलायची असेल तर कठोर मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे.विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये काय बनायचं आहे याचे ध्येय ठरवून वाटचाल करणे गरजेचे आहे.प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगात अनेक गुण असतात परंतु आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना चालना देऊन जिद्द चिकाटी व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यास करून शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवून गरीब विद्यार्थ्यांना त्यांची परिस्थिती बदलणं शक्य आहे विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट न सोडता शिक्षण पूर्ण करावे असे आवाहन यावेळी संजय बडे यांनी केले यावेळी श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप शिर्के व बारकू खंडागळे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तर विजयकुमार भोसले यांनी थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेल्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली यावेळी ओंकार मिसाळ, सानुली खंडागळे,विश्वधन वाघमारे या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला रणजित पवार,सुधाकर गंधले,दत्तू साठे, सुजाता म्हसवडे,रेश्मा आतार,शुश्रूषा मुळखेडे आदी सह विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया फुगे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार विद्या यादव यांनी मानले.






