बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने मा. श्री. गणेशभाऊ करे पाटील यांचा सन्मान. *************************करमाळा प्रतिनिधी: – आशा चांदणे. करमाळा यश कल्याणी सेवाभाव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गणेश भाऊ करे पाटील, यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य खूप उत्कृष्ट व कौतुकास्पद असल्याचे बहुजन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे या म्हणाल्या, मा. गणेश भाऊ करे पाटील यांना इंडोनेशिया या देशामधील रेकटोरॅट उद्याना विद्यापीठ, बाली व मायक्रोबायाॅलाॅजीस्ट सोसायटी आॅफ इंडिया यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय बायोटेक्नोलॉजी जैवतंत्रज्ञान विचार परिषदेसाठी निवड होवुन यशस्वी दौरा केल्या बदल, मा. श्री. गणेश भाऊ करे पाटील यांना बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले, यावेळी उपस्थित जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे मॅडम, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रमिलाताई जाधव मॅडम, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भिसे सर, जिल्हा सचिव श्री. आबासाहेब झिंजाडे, तालुका सचिव श्री. प्रदिप पवार, संपर्क प्रमुख श्री प्रमोद खराडे, श्री. संभाजी शिंदे, श्री. सचिन नवले, सौ. माधुरीताई कुंभार, ज्योती माने. इ. उपस्थिती हा सन्मान करण्यात आला.







