एकाच वेळी दोन वधूशी लग्न करणाऱ्या वराविरुद्ध व्दिभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत अकलूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
अकलूज (प्रतिनिधी )माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन मुलींशी लग्न केलेल्या वराविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अकलूज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेवाडी-अकलूज येथील राहुल फुले यांनी हॉटेल गलांडे येथे शुक्रवार (ता. २ ) रोजी १२.३० वा. च्या सुमारास गट नंबर २ येथील अतुल अवताडे याने डोंबिवली- मुंबई येथील रिंकी व पिंकी ( वय ३६ ) या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्वीभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता या तक्रारीवरून पोलिसांनी अतुल अवताडे यांच्या विरुद्ध १९६० च्या कलम ४९४ नुसार व्दिभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र (एन.सी क्र. 1772 / 22 ने ) गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत







