*दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेत दिव्यांगातून एक आमदाराची नियुक्ती व्हावी.किशोरसिंह माने-पाटील.*
संग्रामनगर दि.५ (केदार लोहकरे यांजकडून)दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेत दिव्यांगातून एक आमदाराची नियुक्ती व्हावी.असे मत माळशिरस येथे पंचायत समिती कार्यालयातील अपंग कक्ष कार्यालयात विजयसिंह मोहिते-पाटील दिव्यांग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की,आज सर्वच क्षेत्रात आरक्षण आहे.पण अपंगांच्या विविध समस्यांच्या मागण्या थेट विधान परिषदेत मांडण्यासाठी त्यांच्यातील एका दिव्यांगाची विधान परिषद सदस्य पदी थेट नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगांना साखर,गहू, तांदुळ,आयडियुडी कार्डचे वाटप,एक हजार रूपयाचा धनादेश व वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाने आयोजन करून साजरा केला.त्याचे वाटप किशोरसिंह माने पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन विजयसिंह मोहिते-पाटील दिव्यांग संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शहाजी (बापू) माने-देशमुख यांनी केले होते. या कार्यक्रमाला श्रीमंत गुंड गुरूजी, अनिल अन्नदाते गुरूजी, अशोक कोळेकर, संतोष घाडगे,राजू पवार,बानू मखर, छाया एकतपुरे, बाबासाहेब एकतपुरे,शैलजा जावीर,श्री.लवटे,जांभुड बुवा, अशोक माने आदी उपस्थित होते.






















