मोबाईल ॲप बनवू शकते शेतीस सोईस्कर : कृषी कन्यांचा सल्ला
विझोरी (ता. माळशिरस), येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषीमहाविदयालयातील कृषीकंन्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देणारे ॲप “अग्रोवन” बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटिल, रत्नाई कृषी महाविदयालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपूरे ( कार्यक्रम समन्वयक) व प्रा. एम. एम. चंदनकर यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकंन्या काजल भोसले, वैष्णवी बर्वे, नाज आतार, मनिषा दगडे, श्रुती काळे, प्रतिभा डांगे, रत्नप्रभा धाईजे यांनी विझोरी या गावात शेतीविषयक ॲप “ॲग्रोवन” बद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. भारत हा कृषीप्रधान देश आहे तसेच कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे पण डिजिटल शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे असे मत कृषीकन्यांनी व्यक्त केले. कृषीकन्यांनी शेती विषयक ॲप अँग्रोवन शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून, ॲप कसे वापरावे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. या विषयी माहिती देताना ॲप मध्ये असलेले सर्व मुद्दे जसे की, हवामान अंदाज कसा पाहावा, पिकांवर येणारे रोग, किटकांचे व्यवस्थापन, जनावरांची काळजी ॲपच्या सहाय्याने कशी घ्यावी, शेतात पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, त्याचप्रमाणे बाजार दर, कृषी संबधित चालू घडामोडी याविषयी सर्व माहिती ॲग्रोवन या ॲप मध्ये मराठी भाषेत मिळते, असे मार्गदर्शन कृषी कन्यांनी दिली. या प्रात्यक्षिकास गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.







