*निमा संघटनेच्या वतीने डॉ.एम.के.इनामदार व डॉ.टी.आर.कदम यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत.*
संग्रामनगर दि.१ (केदार लोहकरे यांजकडून)मला आजपर्यंत विविध संस्थांकडून 10 ते 12 जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत.परंतू आज घरच्या लोकांनी दिलेला जीवनगौरव हा पुरस्कार मला अधिक जवळचा आहे असे मत प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांनी व्यक्त केले. अकलूज निमा संघटनेच्या वतीने अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार व माजी एम. सी.आय.एम.सदस्य डॉ.टी.आर.कदम यांना मानाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुहास जाधव,केंद्रीय निमा संघटनेचे सहसचिव डॉ.दत्तात्रय कोकाटे,विभागीय सचिव डॉ.दत्तात्रय होनमाने,निमा माढा अध्यक्ष डॉ.सुरेश व्यवहारे,निमा पंढरपूर अध्यक्ष डॉ.किशोर बागडे,माढा निमा वुमन फोरम अध्यक्ष डॉ.निशीगंधा माळी,निमा माळशिरस तालुकाध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,डॉ.एम.पी.मोरे,अकलूज आयएमएमचे अध्यक्ष डॉ.संतोष खडतरे,होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन तालुकाध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले,सौ.साधना इनामदार, डॉ.सौ.अंजली कदम यांच्यासह निमा संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.डॉ इनामदार सर यांचा 40 वर्षाचा pathlab ते cathlab हा प्रवास नवीन पिढीसाठी प्रेरणा देणारा आहे,त्यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे. तसेच डॉ.तानाजीराव कदम सरांनी आपल्या ४० वर्षांच्या वैद्यकिय कारकिर्दीत गोरगरिबांची सेवा केली तसेच त्यांचे निमा संघटनेतील योगदान खूप मोठे आहे.डॉ.इनामदार सर यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले व,मेडिकल क्षेत्रमध्ये अपडेट राहून अद्ययावत ज्ञान घेऊन रुग्णसेवा ही घरातला व्यक्ती समजून करावी असा सल्ला दिला तसेच जीवनगौरव पुरस्कार दिल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली असल्याचे आवर्जून सांगितले. निमा अध्यक्ष डॉ सुहास जाधव यांनी निमा संघटना ही BAMS डॉक्टरांची देशव्यापी संघटना असून ती सदैव पाठीशी खंबीर उभी असल्याचे सांगितले.यावेळी डॉ.शिरीष रणनवरे,डॉ.एम.पी.मोरे यांच्यासह संघटनेने डॉ.एम.के.इनामदार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.विद्या एकतपुरे, डॉ.एम.पी.मोरे,डॉ.अंजली कदम, डॉ.निशीगंधा माळी यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी निमा वुमन फोरम माळशिरस तालुकाध्यक्षपदी डॉ.अंजली कदम,उपाध्यक्ष डॉ.कविता पाटील,डॉ.रूपाली पराडे-पाटील,डॉ.योगिता निटवे,सचिव डॉ.विद्या एकतपुरे, सहसचिव डॉ.उर्मिला पाटील, डॉ.डिकोळे,कोषाध्यक्ष डॉ.शुभदा पोटे,सहकोषाध्यक्ष डॉ.सुमित्रा कोकाटे,प्रसिद्धी प्रमुख डॉ.अर्चना गवळी,सल्लागार डॉ.शैलजा गुजर,डॉ.कांचन कुलकर्णी यांची तर निमा माळशिरस तालुकाध्यक्षपदी डॉ.शिरीष रणनवरे,उपाध्यक्ष डॉ.उदय माने-देशमुख,डॉ.अस्लम शेख,सचिव डॉ.दादासाहेब पराडे-पाटील, खजिनदार डॉ.निरंजन चंकेश्वरा, जॉईंट सेक्रेटरी डॉ.दिलीप पवार, डॉ.अनिल पाटील, लिगल ॲडव्हायझर डॉ.बाळकृष्ण नष्टे, डॉ.दिलीप वाघमोडे,प्रसिद्धी प्रमुख डॉ.सुधीर पोफळे, डॉ.प्रशांत निंबाळकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत निंबाळकर, डॉ.स्वराली गांधी,प्रास्ताविक डॉ.सुधीर पोफळे यांनी केली तर आभार डॉ.दादासाहेब पराडे-पाटील यांनी मानले.
चौकट:-अकलूज सारख्या ग्रामीण भागात गेली ४० वर्ष रूग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा देऊन हजारो रूग्णांचे प्राण वाचविले आहेत.त्याबद्दल डॉ.एम.के.इनामदार सर यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी डॉ.शिरीष रणनवरे व डॉ.एम.पी.मोरे सर यांनी केली असून त्याला सर्व वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनेच्या वतीने सर्व तो परी प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले.*







