*खंडपीठ क्रिकेट चषक स्पर्धेत सांगली वारियर्स संघाने पटकावले विजेतेपद*
संग्रामनगर दि.२८ (केदार लोहकरे यांजकडून)सांगली बार असोसिएशन,सांगली व खंडपीठ कृती समिती यांचे संयुक्त विद्यमाने टी 20 लेदर बॉल खंडपीठ चषक क्रिकेट स्पर्धा सांगली येथे छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये दिनांक 24 ते 27 नोव्हेंबर रोजी पार पडल्या.या स्पर्धेत सांगली वारियर्स संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर,सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सोलापूर करीता कोल्हापूर येथे खंडपीठ /सर्किट बेंच स्थापन व्हावे या करीताचा लढा गेली 35 वर्षे सुरु आहे.सदर लढ्या करीता या सहा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. खंडपीठ मागणी सर्व स्तरातून होत आहे याकरिता खेळाडू देखील मागे नाहीत,सांगली जिल्ह्याने पुढाकार घेऊन हा खंडपीठ क्रिकेट चषक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.सहा जिल्ह्यातील वकील खिलाडू वृत्तीने एकत्र येऊन या स्पर्धे मध्ये भाग घेतला. शेवटचा अटीतटीचा सामना सांगली वारियर्स व सिंधुदुर्गमध्ये झाला.सिंधुदुर्ग संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 ओव्हर मध्ये 147 रन्स केले सेकंड इनिंगमध्ये सांगली वारियर्सने एक बॉल,3 विकेट राखून विजयश्री खेचून आणला.तृतीय बक्षीस सांगली डिस्ट्रिक्ट अँडव्होकेट्सने जिंकले.विजेता संघास ट्रॉफी व बक्षीस देणेत आले. शेवटचे सामन्यानंतर सहा जिल्ह्यातील खेळाडूनी एकत्र येऊन कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे आशा घोषणा देण्यात आल्या.सदर स्पर्धेचे बक्षीस व चषक खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रशांत जाधव,माजी अध्यक्ष अॅड.भाऊसाहेब पवार,खंडपीठ कृती समिती सचिव अॅड.विजय ताटे- देशमुख,सांगली बार असोसिएशनचे सचिव अॅड.अर्चना उबाळे यांचे हस्ते देण्यात आले.खंडपीठ चषकमध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच अॅड.प्रितम शिंदे ठरले. खंडपीठ चषक सिरीयल मध्ये बेस्ट बॉलर अॅड.शैलेंद्र हिमगिरे,मॅन ऑफ द सिरीयल व बेस्ट बॅट्समन अॅड.प्रथमेश नाईक सिधुदुर्ग यांना देण्यात आला.सदर चषक पार पाडणे करिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष अॅड.विवेक घाटगे,बार कौन्सिल चे सदस्य अॅड.संग्राम देसाई,अॅड.भगवानराव मुळे,अॅड.उमेश मानकापुरे, अॅड.कुलदीप निकम,अॅड.रत्नेश जोशी,अॅड.सुर्यकांत यादव,अॅड.महेंद्र देशमुख,अॅड.राजेंद्र रावराणे,अॅड.शिवाजीराव मर्ढेकर, अॅड.दिलीप धारिया,अॅड.शिवराज चुडमुंगे यांचे सहकार्य लाभले. सदर बक्षीस समारंभास सांगली बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.विश्वजीत नरवाडे, सचिव अॅड.अर्चना उबाळे,अॅड.शशिकला पाटील,अॅड.शितल मदवाने,अॅड.मेहबूब बाणदार,अॅड.संतोष कट्टीमनी,अॅड.सुप्रिया कांबळे, अॅड.किरण सादरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.विक्रम सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड.शितल मदवान यांनी केले.







