*शिवरत्न* मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अकलूज: पुणे येथील ॲलो हेल्थकेअर, शाखा माळीनगर यांच्या तर्फे अकलूज येथील शंकरनगरच्या शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी कर्मचाऱ्यांच्या उंचीच्या मानाने वजन, चरबी (टोटल फॅट), वयोमानानुसार कामाची क्षमता, निरोगी शरीराचे लक्षणे, शरीरातील ऊर्जेचे विनिमय इत्यादी बाबींवर तपासणी करण्यात आली. ॲलो हेल्थ केअरचे फारूख शेख, रोहित दानोळे, इरफान मुलाणी व रूपाली निंबाळकर यांनी चेकअपचे काम पाहिले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद कुंभार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.भरत साठे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अश्रफ शेख, मुख्य लेखापाल निवृत्ती भोसले, ग्रंथपाल डॉ. संदीप लोखंडे, कार्यालयीन वरिष्ठ लिपिक अमोल खरात व सौ. आशा खंडागळे हे उपस्थित होते.







