स. मा. वि. च्या 19वर्षीय मुलींचा फुटबॉल संघ जिल्ह्यात प्रथम.
अकलूज (प्रतिनिधी )जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या 19वर्षीय वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर माने -देशमुख व सर्व क्रीडा शिक्षक यांनी या संघाला मार्गदर्शन केले.शिक्षण प्रसारक मंडळ चे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजित रणवरे,सह सचिव हर्षवर्धन खराडे पाटील,मुख्याध्यापक प्रतापराव पाटील,उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,विद्यालयाचे सभापती,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,यांनी संघाचे अभिनंदन केले.







