*कोल्हापूर जिल्हा न्यायालयमध्ये जिल्हा न्यायाधीश व सिव्हिल न्यायाधीश सिनियर डिव्हिजन संख्या वाढवणे बाबत लवकर पाठपुरावा करू.*न्यायमूर्ती ना. अजेय गडकरी**
संग्रामनगर दि.२८(केदार लोहकरे यांजकडून)मा.उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती व कोल्हापूर चे पालक न्यायमूर्ती मा.अजेय गडकरी हे जिल्हा न्यायालयात येथे न्यायाधीशांचे कार्यशाळेकरीता आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली.यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके यांनी पालक न्यायमूर्ती अजेय गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोल्हापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल उपस्थित होत्या. या प्रसंगी अध्यक्ष अॅड.गिरीश खडके यांनी प्रलंबित कामाची संख्या व त्याप्रमाणात न्यायाधीश संख्या कमी असलेचे पालक न्यायमूर्ती यांचे लक्ष वेधले असता,मा.पालक न्यायमूर्ती यांनी लवकरच याचा पाठपुरावा करून जिल्हा न्यायाधीश व सिव्हिल न्यायाधीश सिनियर डिव्हिजन यांची संख्या लवकरच वाढवली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी डी आर टी ट्रिब्युनल कोल्हापूर येथे मंजूर झालेनंतर त्याकरीता जागेचा देखील प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन पालक न्यायमूर्ती यांचे वतीने देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख, लोकल ऑडिटर अॅड.संकेत सावर्डेकर,जिल्हा न्यायाधीश पी.एफ.सय्यद मॅडम,सिनियर डिव्हिजन श्रीमती व्ही.पी.गायकवाड मॅडम,मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.बाफना, विधी सचिव पंकज पाटील, न्यायाधीश पी.आर.राणे इत्यादी उपस्थित होते.







