सोलापूर / प्रतिनिधी :भैय्या खिलारे -मंगळवेढा शहरातील समाधान खंदारे (वय 32) व जित्ती येथील सिताराम भोसले (वय 20) या दोघा तरूणांनी गळफास घेवूनआत्महत्या केली असल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद झालेली आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत शहरातील साठे नगर येथील समाधान खंदारे याने दि.24 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान एम.आय. डी. सी. परिसरात वायसन्स इंडस्ट्रीजच्या बाजूला रोडच्या कडेलाजंगली झाडाला सुताच्या दोरीने अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.दुसर्या घटनेत जित्ती येथील सिताराम भोसले याने दि.24 रोजी सकाळी 11.00 वा.राहते घरामध्ये पत्र्याच्या अँगलला दारूच्या नशेत लुंगीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.पोलिसांनी याचाही व्हिसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान एकाच दिवशी दोन तरूणांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.







