*जिजामाता कन्या प्रशालेच्या मुलींचा फुटबॉल संघाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक.*
संग्रामनगर दि.२४ (केदार लोहकरे यांजकडून) जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेच्या १४ वर्षीय व १७ वर्षीय वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश प्राप्त केले.या दोन्ही संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मुलींना शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक यशवंत माने-देशमुख यांनी मार्गदर्शन केले.तसेच जयप्रकाश जगताप यांनी खेळाडूंचा सराव घेतला.त्याचबरोबर शाळेतील अक्षता सावंत व गौरी पराडे-पाटील या मुलींची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आणि ईशा घाडगे व ईश्वरी घाडगे या दोन्ही मुलींची धुळे या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक-संचालक जयसिंह मोहिते-पाटील,सभापती सुलक्षणादेवी मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रनवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी व सर्व शिक्षकांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







