दहशतवादी हल्यात शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी व भारतीय संविधान दिनानिमित्त अकलूज येथे 26नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज पोलीस ठाणे, अकलूज नगरपरिषद व दि आर्ट ऑफ लिव्हींग, अकलूज शाखा यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई येथील २६/११ रोजी दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिना निमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे शनिवार दि.26/11/2022 रोजी सकाळी 8ते 5वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान म्हणजे माणुसकी ची पूजा असून आपले मानवी जीवन हे रक्तावरच अवलंबून असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी. असे आवाहन आयोजक अकलूज़ नगरपरिषद, अकलूज पोलीस ठाणे, व दि आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, अकलूज यांचे वतीने करण्यात आले आहे.
अधीक माहितीसाठी प्रा.धनंजय देशमुख (मो-9260710710)व माऊली मुंडफणे (मो-9922140105). या नंबर वर संपर्क साधावा.






