डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे सहजतेने तरुणांच्या हाती पडणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक बाब – धैर्यशिल मोहिते पाटील
प्रतिनिधी/अकलूज ; सोलापूर जिल्ह्यामध्ये Inj. Termin, Inj. Mephentin या प्रकारची, या श्रेणीमधील औषधे बेकायदेशीर विकली जात आहेत या इंजेक्शनामुळे तरुणांमध्ये नशेखोरी, आक्रमकता आणि हिंसक वृत्ती चिंताजनक प्रमाणात वाढली आहे. सदर औषधे हॉस्पिटल वापरासाठी असताना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खुलेआम पणे विकली जात आहेत. यामुळे तरुणपिढी उधवस्त होत असून, सामाजिक कौटुंबिक आणि वैयक्तिक स्वास्थ्य बिघडत आहे. सोलापूर जिल्ह्यामधील होणाऱ्या बेकायदेशीर इंजेक्शन विक्री बाबत गंभीरपणे दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्राद्वारे सोलापूर जिल्ह्याच्या औषध निरीक्षकांकडे केली आहे.मोहिते-पाटील म्हणाले,अशा प्रकारच्या कोणत्याही औषध पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारा व्यसनी व्यक्ती स्वत: विनाशाकडे जातच असते आणि त्याबरोबर बायको, मुले, आप्तपरिवार, मित्रमंडळी कुटुंबांना दु:खात लोटत असते.या मुळे मानसिक सामाजिक स्वास्थ्य बिघडत असते,परंतू वैद्यकीय वापरासाठी असलेली औषधे डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सदर औषधे सहजतेने नशेखोरांच्या हाती पडणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक बाबा आहे.सोलापूर जिल्ह्यामधील डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या श्रेणीमधील औषधे/ इंजेक्शन बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहेत याबाबत गंभीरपणे दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी करावी म्हणून जिल्ह्याच्या औषध निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे..







