मागील घरगुती भांडणाचा मनात राग धरून खंडाळी येथे चुलत्याकडून पुतण्याचा खून ,एकास अटक
खंडाळी तालुका माळशिरस येथे दिनांक १९|११|२०२२ रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास आरोपी नारायण मु गु टराव पताळे याने मागील भांडणाचा राग मनात धरून माझे पती रामचंद्र दिनकर पताळे वय ४५ राहणार पताळे वस्ती खंडाळी निमगावरोड यांना त्यांच्या शेतातील गहू पिकाच्या पाण्याच्या दंडामध्ये पालथे पाडून मानेवर पाय ठेवून श्वास कोंडून जीवे ठार मारल्याची फिर्याद वेळापूर पोलीस स्टेशनला अनिता रामचंद्र पताळे यांनी दिली आहे. वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३२२ कलम ३०२,३२३ प्रमाणे नारायण मुगुटराव पताळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अधिकृत माहीती अशी की खंडाळी निमगावला जाणाऱ्या रोड वरील पातळे वस्ती येथे रामचंद्र पताळे हे राहण्यास आहेत आंम्ही पती-पत्नी दोघे मिळेल तेथे मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करत आहे, त्यांच्या घराच्या पुढील बाजूस चुलत चुलत सासरे नारायण मुगुटराव पताळे हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांची शेती आमच्या घराच्या पाठीमागे आहे त्यांच्या शेजारी चुलत सासरे देविदास शंकर पताळे हे राहण्यास आहेत. सुमारे तीन महिन्यापूर्वी रामचंद्र पताळे व नारायण पताळे यांच्यामध्ये कळशी फेकून मारल्याच्या कारणावरून बा चा बाची झाली होती, तेव्हापासून नारायण पताळे यांचे बोलणे बंद झालेले होते. दिनांक १९/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० च्या सुमारास मी सासू निलावती देविदास पताळे यांच्या घरी कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते त्यावेळी चुलत सासू निलावती व मी घरासमोर बोलत असताना माझा मुलगा दिनेश पताळे हा पळत माझ्याकडे आला व म्हणाला पप्पांना नारबापू त्यांच्या शेतात मारत आहेत, तू लवकर चल असे म्हणाला त्यावेळी मी व माझा मुलगा पळत नारायण पताळे यांच्या गहू पिकाच्या शेतात जाऊन पाहिले असता माझे पती रामचंद्र पताळे यांना चुलत चुलत सासरे नारायण पताळे हे पाण्याच्या दंडामध्ये पालथे पडून मानेवर पाय ठेवल्याचे दिसले ती वेळ सकाळी ११.१५ मिनिटांची होती त्यावेळी मी व मुलगा दिनेश आल्याचे पाहताच नारायण पुताळे हा गहू पिकातून त्यांच्या घराकडे निघून गेला मी व मुलगा दिनेश असे मिळून पती रामचंद्र पताळे यांना पाण्यातून उचलून जमिनीवर ठेवले त्यावेळी माझे पती बेशुद्ध अवस्थेत होते, त्यांच्या छातीवर हात ठेवून पाहिले असता छातीचे ठोके बंद होते, पोट हालत नव्हते त्यामुळे मी व मुलगा दिनेश यांनी पळत जाऊन रोडच्या बाजूस असलेले घरातील इसम शाहरुख शेख यांच्या मोबाईल वरून माझा भाऊ किसन गोरख माने याला फोन करून सदरची घटना सांगितली. त्यानंतर काही वेळाने माझा भाऊ व इतर माझे नातेवाईक आल्यानंतर माझे पती रामचंद्र दिनकर पताळे यांना अभिजीत लावंड यांनी बोलावलेल्या ॲम्बुलन्स मधून उपचारा करता प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर येथे घेऊन गेले असता त्यावेळी तेथील डॉक्टरांनी रामचंद्र पताळे यांना तपासणी केली असता सदर रामचंद्र पताळे हे मयत झाल्याचे सांगितले. याची घटनेची नारायण मुगुटराव पताळे याच्या विरोधात वेळापुर पोलिस स्टेशनला गून्हा नोंद झाल्यानंतर वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी निलेश बागाव यांनी पोलीस कर्मचारी संजय रेगुडे, पोलीस कर्मचारी राहुल फुले, चालक मोरे यांच्यासह त्वरित खंडाळे येथे जाऊन मिळालेल्या माहिती वरून राहत्या घरून नारायण मु गु टराव पताळे याला ताब्यात घेऊन अटक केली. याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव हे करीत आहेत.







