“कुठे पडला रं, अकलूज -वेळापूर रस्त्यावर.”सोशल मीडिया वर मिम्स व्हायरल
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज सांगोला रस्त्यावरील अकलूज -वेळापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,या रस्त्यावर जीवघेणे मोठ -मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून दोन चाकी, चार चाकी वाहनधारक यांना ये -जा करणे जिकिरीचे ठरत आहे.या रस्त्यावर मोठया प्रमाणावर दोन चाकी, चार चाकी वाहनांची वाहतूक होत असते.तसेच अवजड वाहतूक देखील होत आहे.शाळा, महाविद्यालय ला जाणारे विद्यार्थी देखील या रस्त्यावरून ये जा करीत असतात.या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालवीत असताना खड्डे चुकवून वाहन चालवावे लागत आहे. काही वेळेस खड्डे चुकवीत असताना वाहन दुसऱ्या खड्यात जाऊन आदळत आहे. या खड्यामुळे अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत.या रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे वाहनधारक यांना होत असलेल्या त्रासा बद्दल सध्या सोशल मीडिया वर “कुठे पडला रं, अकलूज -वेळापूर रस्त्यावर “असे जखमी झालेल्या कलाकारांचे फोटो टाकून खिल्ली उडवीणारे मिम्स तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे हा रस्ता तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील काही खड्डे मुजविले आहेत. परंतु त्यामुळे मोठया प्रमाणावर धूळ निर्माण होत आहे. तसेच मुजविलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून मोठे वाहन गेले की धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे काम सध्या सुरु असले तरी. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी अर्धवट काम करण्यात आले आहे.सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.







