*पचका रे पचका वेब सिरीजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण होत आसल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटील यांनी समाधान व्यक्त केले.*
संग्रामनगर दि.१९(केदार लोहकरे यांजकडून)शंकरनगर-अकलूज येथे देवकमल प्रोडक्शन निर्मित” कॉलेज बंद ” या लघुचित्रपटाच्या चित्र फितीचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी देवकमल प्रोडक्शनबद्दल गौरव उदगार काढले. आज शिवरत्न बंगल्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण टीम व कलाकारांची व्यक्तीश्: चौकशी करून त्यांना प्रोत्साहन दिले तसेच देवकमल प्रोडक्शनच्या टीमच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला तर सर्व कलाकारांना उत्साह व प्रोत्साहन मिळावे म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. “कॉलेज बंद” लघु चित्रपट अनावरण प्रसंगी केला.देवकमल प्रोडक्शनच्या माध्यमातून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत आजपर्यंत युट्युबवर देवकमल प्रोडक्शन नावाने पचका रे पचका वेब सिरीज चालू असून त्यावरच आज ” कॉलेज बंद ” हा लघु चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे सदर वेब सिरीजच्या माध्यमातून एक विरंगुळा मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे असे देवकमल प्रोडक्शनचे निर्माते पंढरीनाथ थोरात यांनी सांगितले सदर प्रसंगी सहनिर्माते सिद्धेश्वर शिंदे व कलाकार माधवी साठे,पल्लवी जगताप,पंढरीनाथ थोरात,सुधीर गिरी,अमोल थोरात,रंजीत कडाळे,अभिजीत खरात,संजय गायकवाड,अनिल माने,सुशांत थोरात या सर्व कलाकारांनी हजेरी लावली तर सतीश अडगळे यशवंत मस्के,अतुल माने हे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार निर्माते उपस्थित होते. या वेबसिरीजमध्ये उदयनगर,माळेवाडी (अ) सराटी,अकलूज,शंकरनगर या भागातील हे कलाकार आपली कला सादर करीत आहेत.
















