अकलूज नगरपरिषदेचे लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरण-स्वच्छता अभियान—————————————अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषद कर्मचारी यांचेकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सर्व कर्मचारी यांना माझी वसुंधरा शपथ देण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे व सर्व नगर परिषद कर्मचारी सहभागी होते.स्वच्छ भारत अभियानात सातत्य राखणेच्या दृष्टीने संपुर्ण नागरी भारत कचरामुक्त करणेच्या दृष्टीने केंद्रशासनाच्या धोरणानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 चा प्रारंभ करणेत आलेला आहे. सदर अभियान दि. 02/10/2021 ते दि. 31/12/2022 पर्यंत राबविले जाणार असून, या अभियाना मुख्य उद्देश “कचरामुक्त शहरे” हा आहे. शहर सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छतेचे महत्व आहे. स्वच्छतेशिवाय शहराचे सौंदर्यीकरण अशक्य आहे. त्यामुळे शहरे स्वच्छ झाली तर सुंदर दिसतील या उद्देशाने महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णयान्वये “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022” आयोजित केली आहे. त्याअनुषंगाने अकलूज नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023, माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगर परिषद कर्मचारी यांच्या सहभागातून शहर सौंदर्यीकरण-स्वच्छता अभियानाचे आयोजन शनिवार,दि. 19/11/2022 रोजी सकाळी 7.00 ते 10.00 या वेळेत जयसिंह चौक ते संत गाडगे बाबा चौक , जयसिंह चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणी रस्तेसफाई श्रमदानामार्फत संपुर्ण परिसर स्वच्छ करणेत आला.
















