*मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या पाठपुराव्याला यश….**अखेर सुमित्रा नगर वेळापूर गटारी रस्ता दुरुस्तीचे काम चालू**
वेळापूर सुमित्रा नगर या ठिकाणी गटारीचे व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू झाले आहे.रस्ता गटारी अशा मूलभूत प्रश्न पासून अनेक वर्ष त्या ठिकाणी असणारी जनता वंचित होती हेच लक्षात घेऊन मैत्री प्रतिष्ठानचे माळशिरस तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वेळापूर ग्रामपंचायत निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. तसेच विविध अधिकारी कार्यालय यांना पत्रकार करून अखेर वेळापूर या ठिकाणी असणाऱ्या सुमित्रा नगर मध्ये गटारी व रस्त्याचे काम चालू झाले आहे. आणि या कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण धडपड करत आहेत अशी दिसत आहेत. परंतु या कामांसाठी संजय वाघमोडे याची तळमळ जनतेला दिसलेली आहे.त्यामुळे सुमित्रा नगर मधील जनतेकडून संजय वाघमोडे यांचे कौतुक होत आहे.*












