*माणसाचा खरा धर्म नेहरूंनी सांगीतला.अँड.शंकर निकम.* संग्रामनगर दि.१४ (केदार लोहकरे यांजकडून)आज 14 नोव्हेंबर बालदिन व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे जन्मदिनाच्या औचित्य साधून अॅड.शंकर निकम (मुंबई) यांनी आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानात ते बोलत होते या व्याख्यानात शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविदयालय राज्यशास्त्र विभागातील विदयार्थी सहभागी झाले होते. अखंड भारताची मांडणी ते सध्या भारताची परीस्थिती याबाबत पंडीत नेहरूंनी केलेली सविस्तर मांडणी अॅड.शंकर निकम यांनी केली.भारतमाता या शब्दाच्या व्याप्तीपासुन व्याख्यानास सुरवात झाली, त्यांनी लिहलेली पुस्तके,पित्याने कन्येस लिहलेली पत्रे,जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन,डिस्कव्हरी ऑफ इंडिया ते आयडिया ऑफ इंडियाची नेमकी भुमिका काय होती याबद्दलची भुमिका त्यांनी स्पष्ट केली. पंडित नेहरुंच्या शेती,औद्योगीकरण,उद्योग व्यवसाय,भारताचे नवनिर्माण, परराष्ट्र धोरण,अलिप्ततावाद, धर्मनिरपेक्षता,लोकशाही, समाजवाद अशा अनेक पैलूवर अॅड.शंकर निकम यांनी प्रकाश टाकला. या फेसबुक ऑनलाईन व्याख्यानाचा राज्यशास्त्र विभागातील बी.ए.भाग दोनच्या विदयार्थ्यानी लाभ घेतला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयामध्ये सतत वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्यातुनच या फेसबुक ऑनलाइन लाईव्ह व्याख्यानात सहभाग घेण्यात आला होता. लाईव्ह व्याख्यान सादरीकरणा साठी प्रोजेक्ट सादरीकरणासाठी डॉ विश्वनाथ आवड,प्रकाश भोसले यांनी विशेष प्रयत्न केले.








