[]महावितरणच्या गलथान कारभारामुळे माळीनगर हद्दीतील शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक ,लाखोंचे नुकसान []खंडाळी (प्रतिनिधी)[] खंडाळी (ता.माळशिरस) गावाच्या शिवेवर माळीनगर हद्दीतील गट.क्रं.४८/2/ब शेतकरी संतोष अंबादास माने देशमुख यांच्या मालकीचा चार एकर ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाला.त्याच बरोबर ठिबक,मोटार,वायर असे लाखो रूपयाचे नुकसान झाले.शेतकऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतातील टाॅन्सफाॅरमरवर चुकीच्या पद्धतीतीने कट पाॅईंट बसवल्याने जंपवरती जाळ झाल्याने चार एकर ऊस जळून खाक होऊन लाखो रूपयाचे नुकसान झाले.महावितरणला शेतकऱ्यांनी जंपवरीती वारंवार छोटा जाळ होत असल्याचे सांगितले होते.परंतू महावितरणच्या गलथान कारभारामुळे हातातोंडाशी आलेले ऊसाचे पिक गेल्याने लाखो रूपयाचा फटका बसणार आहे तरी महावितरण त्वरीत पंचनामा करून शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.[]








