*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा*
अकलूज (प्रतिनिधी )*’देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, सारे मिळून करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार.’**पंडित नेहरूंच्या हृदयातील अमूल्य ठेवा म्हणजे मुलं. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे. शाळेमध्ये असताना मुलं काय शिकतात यापेक्षाही त्यांच्यावर कोणते संस्कार होतात* *यासाठी पंडित नेहरू नेहमी आग्रही होते. 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन खऱ्या अर्थाने बालदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना नेहमीच लहान मुलांबद्दल प्रेम होते. त्यामुळे मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणत.**अशा या चिमुकल्यांचा आनंद साजरा करण्यासाठीचा आजचा हा दिवस या दिनाच्या निमित्ताने शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.**कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरूंच्या फोटोचे पूजन करून लहान मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय जितेंद्र माने देशमुख सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील बालचमुंच्या नृत्याचे सादरीकरण झाले तर काही बालचमुंनी बालदिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मद्यपान विरोधात स्कीट सादर केले.**त्यानंतर प्रशालेमधील शिक्षकांच्या दोन ग्रुप डान्सचे सादरीकरण झाले. आपले शिक्षक आज आपल्यासाठी नृत्य सादर करत आहेत हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता आणि ते टाळ्यांच्या कडकडाटानी शिक्षकांच्या नृत्याला दादही देत होते या दोन्ही ग्रुप डान्स नंतर प्रशालेतील मुख्याध्यापकांसह इतर काही शिक्षकांनी फॅशन शो सादर केला. तसेच काही शिक्षकांनी आपल्या सुंदर आवाजामध्ये गाणी देखिल गायली. त्यानंतर मुलांसाठी वेगवेगळ्या फनी गेम्स घेण्यात आल्या त्यामध्ये फुगे फोडणे, तीन पायाची रेस, पोत्यात पाय घालून पळणे, हात न लावता बॉबीन खाणे, संगीत खुर्ची यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले**शिवरत्न शिक्षण संस्था आयोजित शिवरत्न लक्ष 2022 या शिक्षकांसाठीच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत आपला उत्कृष्ट प्रभाव पडणाऱ्या प्रशालेतील शिक्षिका सुवर्ण निंबाळकर मॅडम आणि क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दाखवत धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सौ काजल मोरे मॅडम यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला* *त्याचप्रमाणे प्रताप क्रीडा मंडळ आयोजित बालक्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभाग नोंदवून नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* *अशाप्रकारे आजचा हा बाल दिनाचा कार्यक्रम अगदी उत्साही, आनंदी वातावरणात पार पडला.**या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थी चि. ध्रुव कांबळे आणि प्रशालेतील शिक्षक श्री गणेश शेवकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन नववीतील विद्यार्थी चि. सार्थक मुदगल याने केले.**मुलंही ओल्या मातीसारखी असतात त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात. मुलं म्हणजे भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. चला तर मग या जगातील आपल्या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया आणि या निरागस गोड मुलांना बाल दिनाच्या गोड गोड शुभेच्छा देऊयात.*








