*पवारवस्ती-बिजवडी शाळेत बालदिन विविध उपक्रमांनी आनंदात साजरा….!*
संग्रामनगर दि.१४ (केदार लोहकरे यांजकडून)स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.१४ नोव्हेंबर १८८९ ला पंडीत नेहरु यांचा जन्म झाला.लहान मुले आणि गुलाबाची फुले चाचा नेहरुंना खूप आवडायचे.लहान मुले हेच उदयाच्या भारताचे भविष्य आहे असे ते नेहमी मनायचे. अशा या बालदिनानिमित्त जिल्हा परिषद पवारवस्ती- बिजवडी शाळेत लिंबू-चमचा,तीन पायाची शर्यत,पोत्यातील उडया.डोक्यावर चेंडू घेऊन पळत जाणे,लंगडी,आंधळी कोशिंबीर,गाढवाच्या चित्रास शेपूट लावणे अशा विविध स्पर्धा घेऊन मुलांचे मनोरंज करण्यात आले.त्यानंतर मुलांना बक्षिसे व गोड खाऊ देण्यात आला. दुपारच्या सत्रात अकलूज मधील स्थानिक कलाकाराने बहिर्जी नाईकाची भूमिका साकारलेला *शिवप्रताप गुरुडझेप* हा चित्रपट सर्व मुलांना दाखवण्यात आला. एकंदरीत आजचा बालदिन सर्व मुलांचा आनंदात साजरा झाला.दिवसभरातील विविध उपक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक नितीन बनकर व मंजुषा कांबळे यांनी परिश्रम घेतले.







