*पानीव येथील मोहन गुरव यांची अॅट्रासिटी व अन्य गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता.*
अकलूज दि.११ (प्रतिनिधी)पानीव (ता.माळशिरस) येथील मोहन शिवाजी गुरव यांचेवर तेथील रहिवाशी सौ.छाया संजय दणाने यांनी दि. २२/८/२०१६ रोजी पानीव येथे अनु. जाती व अनु. जमातीअत्याचार प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०१५ चे कलम ३(१)(r)(s)(w)(i)(ii) भारतीय दंड संहिता कलम ३५४अ,५०४ प्रमाणेअकलुज पो. स्टेशन मधे गुन्हा दाखल केला होता.त्याचा तपासश्री.तिरुपती काकडेसोा,उपविभागीय पोलिस अधिकारी अकलुज विभाग यांनी करुन मा.विशेष न्यायाधीश श्री.एम.एन.पाटील सोा.सत्र न्यायालय माळशिरस यांचे कोर्टात खटला दाखल केला.त्या केसचा नुकताच निकाल लागला असुन सबळ पुराव्या अभावी अँट्रासिटी व वरील अन्य कलमाद्वारे दाखल केस चालवुन निकालात काढली व मोहन शिवाजी गुरव यांची निर्दोष मुक्तता केली.या केसमध्ये सरकारतर्फे सरकारी वकील म्हणुन अॅड.संग्राम पाटील यांनी तर आरोपी गुरव यांचे मार्फत अॅड.ए.पी.भोसले यांनी काम पाहिले.निकाल जाहीर होताच अॅड.भोसले व मोहन गुरव यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.







